Ad will apear here
Next
संधिवाताचे दुखणे
शरीर चालते ते सांध्यांमुळे. दोन हाडे एकत्र येतात तेथे सांधा बनतो. हालचाल करणे हे सांध्यांचे महत्त्वाचे काम आहे. हे सांधे दुखायला लागले, की माणसाच्या शारीरिक हालचालींवर नियंत्रण येते. यालाच संधिवात म्हणतात. सांधेदुखीवर योग्य उपचार झाले नाही, तर हा जुनाट आजार म्हणून कायमचा शरीराचा भाग होऊ शकतो.

हे टाळण्यासाठी काय करावे, हे संधिवाताचे विशेषतज्ज्ञ डॉ. श्रीकांत वाघ यांनी 'संधिवाताचे दुखणे 'मध्ये सांगितले आहे.

सांध्यांची, मणक्याची रचना, संधिवात म्हणजे नेमके काय, त्याची वेगवेगळी रूपे, संधीवाताची कारणे, ऱ्हुमॅटॉलॉजी, ऱ्हुमॅटॉलॉजिचे आजार, ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट कोण असतात, सांधेदुखीवर त्यांच्याकडून उपचार करून घेण्याचे फायदे, निदान पद्धती, उपचार, वेदनेचा अनुभव, तिचे प्रकार, परिणाम, उपचार,

संधीवाताची औषधे, त्यांचे कार्य, उपद्रव, त्यांच्या वापराविषयी सूचना, सांधेदुखी व व्यायाम, योगसाधना, संधिवात आणि आहार, आयुर्वेद आणि संधीवात, संधिवाताचे विविध प्रकारचे दुखणे, त्याची लक्षणे, उपचार पद्धती, मुलांमधील संधिवात, विविध औषधे, त्यांचा उपयोग व ते घेताना घ्यावयाची दक्षता, याबाबत विस्तृत माहिती यात दिली आहे.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZMHBD
Similar Posts
पेन्शन आता प्रत्येकाला ! बालपण, तारुण्य, आणि बुद्धत्व या तीन अवस्था माणसाच्या आयुष्यात असतात. यातील वृद्धत्वासाठी आर्थिक तरतूद तरुणपणीच केली तर हा काळ सुखाचा समाधानाचा जातो. पण अनेकदा याकडे दुर्लक्ष होते आणि 'नको ते म्हातारपण' असे वाटू लागते. असे होऊ नये म्हणून सरकारने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच (निवृत्ती वेतन) सोय केली होती
निर्णय आणि जबाबदारी समोर कामाचा डोंगर असला की आपण हताश होतो. पण हा कामाचा डोंगर निर्माण झाला कसा याचा विचार आपण केव्हाही करत नाही. काम मागे राहायला आपणच कारण असतो आणि मग साचलेली कामे होणे अशक्य वाटायला लागतं. आपल्या जगण्यात अशी परिस्थिती अनेकदा येते. काहीवेळा निर्णय घेता येत नाही, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता येत नाही
सहज लिहिताना लिहिण्याची आवड अनेकांना असते. तशी आवड शासकीय सेवेत असूनही शहाजी कांबळे यांनी जोपासली आणी मनात हळुवारपणा जपून अनेक विषयांवर मनातील विचार ते लिहित गेले. जे सहज सुचले, जे मनाला स्पर्शून गेले, जे स्वतः अनुभवले, ते त्यांनी 'सहज लिहिताना...'मधून मांडले आहे. यात पत्नीचा सोशिकपणा, माहेरपानाला आलेल्या मुलीच्या
व्हॉट्स अप ? 'ही गोष्ट आहे डॉ. सुजय शास्त्रीची, एका रेडिओलॉजिस्टची! आपल्या रोजच्या एकसुरी आयुष्याला कंटाळलेल्या सुजयला आयुष्यात काहीतरी 'थ्रिलिंग' घडावं असं वाटत असताना, 'व्हॉट्स अप'मुळे त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते, त्याची ही गोष्ट...' डॉ. अमित बिडवे यांनी प्रस्तावनेतच कादंबरीची अशी उत्कंठावर्धक सुरवात केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language